नवी दिल्ली – असे म्हटले जाते की ‘जेव्हा जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो’, अगदी असेच इंडोनेशियामधील एका व्यक्तीवर देव प्रसन्न झाला असून त्याला ‘छप्पर फाडके’ फळ मिळाले आहे. इंडोनेशियातील एका व्यक्तीच्या घरात आकाशातून एक अनोखी गोष्ट पडली आणि तो रातोरात कोरोडापती झाला. खरंच, सुमात्रामध्ये राहणारा ३३ वर्षीय ताबूत निर्माता जोशुआ हुतागालुंग याच्या घरी रात्रीच्या वेळी एक उल्काचा तुकडा पडला आणि तो एका रात्रीत करोडपती झाला.
इंडिपेंडेंट या संस्थेच्या वृत्तानुसार, जोशुआ हुतागालुंगने एक दशलक्ष पौंड (सुमारे ९.८ कोटी रुपये) किंमतीची उल्का विकल्यानंतर करोडपती झाला आहे. ही घटना घडली होती तेव्हा हुतागालुंग आपल्या घराबाहेर काम करत होता. अचानक फाटलेल्या छताच्या घरावर २.१ किलो उल्काचा तुकडा पडला. त्या घटनेविषयी हुतागालुंग म्हणाला की, हा आवाज इतका जोरात होता की घराचे काही भाग हादरले आहेत घराचे छत तुटलेली आहे. यानंतर माझी नजर दगडावर पडली. जेव्हा मी आकाशातून पडलेला दगड उचलला तेव्हा तो गरम होते. जोशुआने हे चित्र फेसबुकवर शेअर केले आहे.
इंडिपेंडंटच्या मते जोसुआच्या घरात पडलेला उल्काचा तुकडा सुमारे साडेचार अब्ज वर्ष जुना आहे. या दगडाची किंमत प्रति ग्रॅम सुमारे ६३००० एवढी आहे. जोशुआ हुतागालुंगने आता उल्काचा तुकडा अमेरिकेतील तज्ज्ञ संग्राहक जारेड कोलिन्स यांना विकला आहे. त्यानंतर कोलिन्सने हे पुन्हा कलेक्टर जेपी पाटेक यांना विकले, ज्यांनी अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर मेटेरोईट स्टडीजमध्ये ते लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवले आहे.
मात्र, चुंबकीय गुणधर्म असलेल्या दुर्मिळ खडकात किती रुपये विकले गेले हे हुतागालुंगने उघड केले नाही. पण दगडाच्या ऐवजी त्याला मिळालेली रक्कम दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे जवळपास ९.८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.