नवी दिल्ली – पोलिसांनी टाकलेल्या धाडीत नोएडाच्या एका भागातून कारमधून ६९ लाख १८ हजार रुपये जप्त केले. तसेच घटनास्थळावरून एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. या आरोपीने मुंबईतील नाला सोपारा येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातून ही रक्कम चोरल्याचे चौकशीत सांगितले आहे. ग्रॅनो वेस्टमधील गौरा सिटीजवळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र किती रोख रक्कम जप्त केली आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना नोटा मोजण्याचे मशीन आणावे लागले.
पोलीस उपायुक्त नोएडा हरीश चंद्र यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांना एका खबऱ्याकडून अशी माहिती मिळाली की, कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवली जात आहे. त्यानंतर पोलिस स्टेशनचे प्रभारी मुनीर चौहान यांच्या पथकाने गौर सिटी गोलचक्कर येथून एकाआरोपीला अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून 69 लाख 18 हजार रुपये आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
गुलामवाज उर्फ आरिफ (रा. इमाम कॉलनी, सहारनपूर उत्तर प्रदेश ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी गुलनावझने मुंबईहून गाडीसह रक्कम आणण्यासाठी दोन चालकांना भाड्याने दिले होते, परंतु या दोन्ही वाहनचालकांना त्या रकमेची माहिती नव्हती. घटनास्थळावरून पकडलेले गिरिराज शर्मा आणि रवी नायर या दोन्ही चालकांना पोलिसांनी चौकशीनंतर घरातील सदस्यांकडे सुपूर्द केले आहे. किती रोख रक्कम जप्त केली आहे ? हे शोधण्यासाठी पोलिसांना नोटा मोजण्याचे मशीन मागवावे लागले.
सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या देखरेखीखाली फोरेंसिक टीमच्या उपस्थितीत ही रक्कम मोजली गेली, ज्यात 69 लाख 18 हजार रुपये सापडले.
पोलिसांनी सांगितले की, ही रोकड मुंबईहून चोरी झालेली आहे. मुंबई एका व्यावसायिकाच्या घरी चोरी केल्यानंतर ही रक्कम कारमधून सहारनपूरकडे नेली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला आहे. माहिती मिळताच गुलनवाजचा भाऊ मुंबईच्या नालासोपारा येथे एका व्यावसायिकाच्या घरात काम करतो, अशी माहिती मिळाली. मात्र, या चोरीची नोंद व्यावसायिकाच्या वतीने मुंबई पोलिसांना देण्यात आलेली नाही. हे पैसे पकडल्यानंतर हे रहस्य उघडकीस आले आहे.