नाशिक – कोरोनाच्या संकटात आता चोरट्यांचाही सुळसुळाट झाला असून त्यांनी आता कपड्यांनाही लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. दुकान फोडून चोरट्यांनी रेडिमेड कपडे चोरुन नेल्याची घटना लेव्हीट मार्केट मध्ये घडली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प येथील लेव्हिट मार्केट हे कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच ठिकाणी कपडे लंपास करण्यात आल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. धिरज कन्हैय्यालाल निहलानी (रा.सुखसिंधू सोसा.दे.कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धिरज निहलानी यांचे लेव्हीट मार्केटमध्ये हरिश ट्रेडर्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी (दि.२४) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकान फोडून महागड्या जीन्स पॅण्ट, शर्ट, बनियन, लहान मुलांचे कपडे असा सुमारे २३ हजार ४५० रूपयांचे रेडिमेड कपडे चोरून नेले. अधिक तपास हवालदार साळवे करीत आहेत.