नाशिक – मंगलमयी दीपोत्सवाच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. आज वसुबारस अर्थात गोवत्स बारस आहे. आजची तिथी नक्षत्र आश्विन कृष्ण द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी असही आजच या सणाला म्हणतात. दीपावली या सर्वात मोठ्या सणाचा आजचा पहिला दिवस हा गोमाता व तिचे वासरू यांच्या पूजनाने साजरा केला जातो.. भारत हा कृषिप्रधान देश आहे व हिंदू संस्कृती मध्ये गाईला गोमाता असे संबोधले जाते या गोधना प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपावलीच्या आजच्या प्रथम दिवशी सायंकाळी गाय व तिचे वासरू यांची पूजा करून त्यांना गोड घास दिला जातो. आजच्या गोवत्स पूजनाचा मुहूर्त सायंकाळी ०६.११ पासून रात्री ८.३४ पर्यंत आहे, अशी माहिती दिनेश पंत यांनी दिली आहे. ज्या घरात गाय वासरू असे दूध -दुभते भरपूर प्रमाणात असते अशा घरी लक्ष्मी निवास करते अशी शास्त्र मान्यता आहे.