चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई दौऱ्यावर आले असताना त्यांनी त्यांच्या विमानातून एक फोटो काढला. त्यानंतर त्यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला. अवघ्या काही मिनिटातच हा फोटो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. चेन्नई येथे सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. हा सामना चेपॉक स्टेडिअममध्ये सुरू आहे. आणि मोदींनी याच स्टेडिअमचा एरिअल फोटो काढून शेअर केला आहे. याचनिमित्ताने पंतप्रधानांचे क्रिकेटप्रेमही अनेकांना कळले आहे.
बघा हा फोटो
https://twitter.com/narendramodi/status/1360872166175113217