मनसेचे कुलगुरूंना निवेदन.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने अनुत्तीर्ण करून केलेला अन्याय तात्कालीकपणे दूर करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुलगुरूंना निवेदन दिले आहे.
नुकत्याच लागलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या निकालात अनेक विध्यार्थ्यांना चाचणी परीक्षांत मिळालेल्या गुणांच्या आधारे अनुत्तीर्ण घोषित करून मोठा अन्याय करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला नसून परीक्षा न घेताच विध्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शिक्का मारल्याने त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश घेता येणार नसून ह्यामुळे विध्यार्थांच्या भविष्यावर मोठा आघात होणार आहे. तरी मा. कुलगुरूंनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आधी ठरलेल्या शासन निर्णयाप्रमाणे अभियांत्रिकीच्या सर्व विध्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबत विध्यापिठाच्या परीक्षा विभागास तात्कालिक निर्देश देऊन अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांवरील अन्याय दूर करून दिलासा ध्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील व अरुण दातीर, शहराध्यक्ष सौरभ सोनवणे व तुषार भंदुरे, जिल्हा सचिव संदेश जगताप, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे यांच्या सह्या आहेत.