नवी दिल्ली – चीन सीमेला जोडणार्या सर्व राष्ट्रीय महामार्गांची रुंदी किमान १० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सीमेपर्यंत जाणारे सर्व दुहेरी राष्ट्रीय राज्यमार्ग देखील १० मीटर रुंदीचे केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने जम्मू, काश्मीर, लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्काम आणि इतर डोंगराळ भागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.
सध्या सीमेवर पोहोचणार्या दोन लेन ५.५ मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने डोंगराळ भागात विशेषत: चीन सीमेतल्या दोन-लेन राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीचे प्रमाण बदलले आहे. तसेच सीमा रस्ते बांधणी संघटना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय ), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी ) आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना मुख्य अभियंत्यांना पत्रे देखील देण्यात आली आहेत. वास्तविक जेव्हा वाहनांची संख्या कमी होते, तेव्हा दुपदरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाची रुंदी ५.५ मीटर केली जाते. यासंदर्भात मार्च २०१९ मध्ये नवीन मानकांबाबत आदेश जारी करण्यात आले होते, परंतु संरक्षण मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला आहे. कारण डोंगराळ प्रदेशातील रस्त्यावर अवजड सैन्य वाहने, अन्य वाहने आणि डिझेल, पेट्रोल व गॅस यासाधन सामग्रीसह भरलेली वाहने चालविण्यास समस्या आहे. सदर वाहने वळणावर अत्यंत वेगाने चालवावी लागतात. म्हणून, डोंगराळ भागात जाणार्या फीडर महामार्गाची रूंदी विशेषत: चीन सीमेत जास्त असावी शकते.
संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनंतर दुपदरी राष्ट्रीय महामार्गाची रुंदी दहा मीटर करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सात मीटर रुंद समांतर रस्ता असावा, कारण सायकली, दुचाकी, रिक्षा इत्यादींसाठी तेथून जातात, असेही सांगण्यात येत आहे.