बिजींग – चीन आणि अमेरिकेबरोबर युरोपीय देशांमध्ये कोरोना महामारीचा कहर वाढलेला आहे. चीनमधील शांघायमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर कोरोनामुळे सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाउन सुरू असून स्वीडन मध्येही भितीचे वातावरण आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. एका दिवसात २६ हजारांहून अधिक रूग्ण संक्रमणाची प्रकरणे झाली.
आणखी कडक निर्बंध – ब्राझीलमध्ये मृतांची संख्या भयानक आहे. येथे एका दिवसात १३४० लोक मरण पावले. १ ऑगस्टनंतर एका दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. स्वीडनमधील कोरोना संसर्गाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान स्टीफन लॉटवेन यांनी म्हटले आहे की, आणखी कडक निर्बंध घातले जातील.
चीनमध्ये चाचणी व संशोधन मोहीम – चीनमधील कोरोना महामारीची दुसरी लाट थांबली नाही. त्यामुळे आता ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चिनी नवीन वर्ष साजरे करण्याकरिता कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. त्यामुळे चीनमध्ये चाचणी व संशोधन मोहीमेस वेग आला आहे. नवीन वर्षात कोट्यावधी लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे हेबेई प्रांतातील अनेक शहरांमध्ये अद्याप लॉकडाउन सुरू आहे.
ब्रिटनमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक – ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असल्याने कोणताही उपाय लागू नाही. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लॉकडाउन आणखी कठोर केले जाईल, असे सांगितले आहे. कारण मृत्यूची संख्या येथे झपाट्याने वाढत असून रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे.
अन्य देशातील स्थिती – जगातील इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकेत मृतांचा आकडा वाढला आहे. जगात कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण २.२ टक्के आहे, तर येथे हे प्रमाण २. ५ टक्के आहे. लस सुरू झाल्यानंतरही रशिया अद्याप कोरोनापासून मुक्त झालेला नाही. रशियात गेल्या २४ तासांत २१ हजारांहून अधिक नवीन रुग्ण प्रकरणे नोंदली गेली आहेत.