नवी दिल्ली: भारताबाबतची चीनची भाषा आता अचानक बदलली असून भारताबद्दलच्या दृष्टिकोनात नरमाई आणि कोमलता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्यांबरोबर संघर्ष करणाऱ्या चीनने आता स्पष्ट केले की, चीन आणि भारत आता मित्र असून आम्ही एकमेकांना धोका देणार नाहीत. तसेच दोन्ही देश एकमेकांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
या संदर्भात चीनने पुढे म्हटले आहे की, चांगल्या वातावरणात सक्षम परिस्थिती निर्माण करून सीमा विवादांसह सर्व मतभेद दूर करून सहकार्याला बळकटी देईल, चीन आणि भारत एकत्र मिळून जगाचा विकास करू शकतात. तथापि, भारताशी संबंधासंदर्भात त्यांच्या प्रदीर्घ प्रतिसादामध्ये वांग यांनी चिनी सैन्य माघार घेण्याच्या विषयावर चर्चा केली नाही. अशा परिस्थितीत अचानक भारताविषयी चीनच्या वृत्तीत बदल होण्याचे प्रमुख कारण काय आहे ? या बदलाची ही प्रमुख कारणे आहे….
– अलीकडच्या काळात चीनने अधिक शत्रू आणि कमी मित्र बनवले आहेत. त्याच्या आक्रमणामुळे तो जगभर एकटा पडला आहे. मात्र लडाखमधील चीनशी झालेल्या तणावात भारताने घेतलेल्या संयमी भूमिकेचे जगभरात कौतुक झाले, तर चीनच्या आक्रमणासंदर्भात सर्व देशांनी थेट निषेध केला.
– उदारमतवादी, बलवान आणि सक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा जगभरात उदयास आली. भारताची आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे. यामुळे कुठेतरी भारत आणि त्याच्या शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा चीनवर दबाव आला आहे.
– बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत चीनने भारताबरोबरचे ताणलेले संबंध संपवण्याचा निर्णय घेतला असावा. असे असूनही चीनने लडाखबाबत आपली भूमिका उघड केलेली नाही. यावरून त्यांनी लडाखचा मुद्दा सोडलेला नाही. मात्र लष्करी संघर्ष संपवून आर्थिक द्विपक्षीय संबंध आणखी पुढे आणण्याची चीनची अपेक्षा आहे.