नवी दिल्ली – भारतातील लसीद्वारे अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू असून शेजारचे देश भारताच्या लसीचे गुणगान करीत आहेत. तर दुसरीकडे चीन हा पाकिस्तानला लस पुरवत असून चीनी सायनॉफॉर्म लस ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर प्रभावी नसल्याचे स्पष्टपणे पाकिस्तानने म्हटले आहे.
कोविड -१९ विरोधी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसानंतर पाकिस्तानने सांगितले की, चीनची सायनोफॉर्म लस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी प्रभावी नाही. चीनकडून पाकिस्तानला सुमारे पाच लाख सिनोफर्म लसीचे दान करण्यात होती. चीनने सुमारे २१ कोटी लोकसंख्येसाठी पाकिस्तानला फक्त पाच लाख लसची देणगी दिली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्यविषयक सहाय्यक डॉ. फैसल सुल्तान यांनी माध्यमांना सांगितले की, प्राथमिक विश्लेषणाचा विचार केल्यानंतर पाकिस्तानच्या तज्ज्ञ समितीने ही लस फक्त १ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांना लागू करावी, अशी सूचना केली असून समितीने या टप्प्यावर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सिनोफर्म लस अधिकृत केलेली नाही.
दरम्यान, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या कोविल्ड या लसींना आणीबाणीला मंजुरी देणारे पाकिस्तान हा पहिलाच देश होता. परंतु इम्रान खान यांच्या सरकारी तिजोरीत लस विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा नाही किंवा भारत सरकारकडून लस मागण्याची हिम्मतही नाही. मात्र, डॉ. फैसल सुल्तान यांनी जाहीर केले की, येत्या महिन्यापासून पाकिस्तानला अॅस्ट्रॅजेनेका लसदेखील मिळणार आहे. मार्चपर्यंत ६० लाख डोसची डिलिव्हरी केली जाईल आणि जूनपर्यंत १.७० कोटी डोस उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. कारण, चीनने पाकिस्तानला दिलेली कोरोना लस अपूरी आहे.
या उलट ३० कोटी लोकसंख्या असलेल्या नेपाळला भारताने कोरोना लसीचे एक कोटी डोस विनामूल्य दिले आहेत, केवळ नेपाळच नाही तर बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, भूतानसह इतर अनेक शेजारच्या देशांनाही लस दिली गेली आहे. भूतानची लोकसंख्या सुमारे साडेसात लाख आहे, परंतु भारताने त्याला आधार म्हणून दीड लाख लस दिली आहे. त्याच वेळी बांगलादेशची लोकसंख्या २ कोटींपेक्षा जास्त असून त्याला २० लाख कोरोनाची लस भारतातून मिळाली आहे.