बीजिंग : जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना युरोपमधील काही देश, ब्राझील आणि भारतासह त्याच्या शेजारी असलेल्या छोट्या देशात अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. त्याच वेळी गेल्या दोन महिन्यांत चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
चीनमध्ये रविवारी सर्वाधिक घरगुती संसर्ग होण्याची नोंद झाली. विशेष बाब म्हणजे सर्व नवीन रुग्ण प्रकरणे दक्षिण-पश्चिम युन्नान प्रांताच्या म्यानमार सीमेला लागून असलेल्या शहरात आढळली आहेत. रुईलीच्या स्थानिक प्रशासनाने शहरातील सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचे तसेच नियम पाळण्याचे काम केले आहे.
म्यानमारमधून आला संसर्ग : चीनच्या रुईली शहरात आढळलेल्या नवीन रुग्ण प्रकरणांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, हे संक्रमण म्यानमारहून आलेल्या नवीन व्हायरसमुळे झाले आहे. ज्या नवीन रुग्णांमध्ये या विषाणूचा त्रास दिसू लागला आहे. या रुग्णांपैकी म्यानमारमधील ११ नागरिक आहेत. रुनी हा युनान प्रांताचा मुख्य संक्रमण बिंदू आहे. या प्रांताची सीमा म्यॉनमारला लागून आहे.
बांगलादेशात ७ दिवस लॉकडाउन :
बांगलादेशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सात दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली गेली आहे. यावेळी सार्वजनिक वाहतूक आणि बाजारपेठा बंद राहतील. इतकेच नव्हे, लॉकडाऊन दरम्यान बाजारपेठाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत लोकांना घरे सोडू नका, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
नेपाळ: या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा ७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. दुसर्या टप्प्यात चीनमधूल आलेल्या लस लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. पहिला लसीकरण कार्यक्रम जानेवारीत सुरू झाला होता, तेव्हा भारताने नेपाळला ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लसीचे डोस पाठविले होते.
ब्रिटन: बोरिस जॉनसन सरकारने लक्षणे असलेल्या कोरोना-संक्रमित रूग्णांची ओळख पटविण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोरोना चाचणी मोहीम सुरू केली. ही चाचणी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
दरम्यान, ब्रिटनमधील बॅडमिंटन स्पर्धासह बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने कोरोनाशी संबंधित निर्बंधामुळे रशिया ओपन २०२१ आणि इंडोनेशिया मास्टर्स या सुपर बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत.