नवी दिल्ली : चित्रपट कलाकारांचे विवाह हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक मान्यवरांची हजेरी आणि आलिशान आयोजनामुळे याबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते. आम्ही अशाच काही महागड्या लग्नाची माहिती तुम्हाला देणार आहोत. पण त्या आपल्याकडच्या नाही तर साऊथच्या चित्रपट सृष्टीतील. या लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो.
ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी
हैदराबादमधील व्यावसायिक विक्रम देव रेड्डी यांचे सुपुत्र राजीव रेड्डी यांचा विवाह ब्राह्मणी रेड्डी हिच्यासोबत झाला. या लग्नात ५०० कोटी खर्च झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा देखील खूप झाली.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी
अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध तेलगू अभिनेता आहे. तेलंगणा येथील स्नेहा रेड्डीसोबत त्याचे लग्न झाले. या लग्नाचा खर्चही १०० कोटींच्या घरात गेला.
सूर्या आणि ज्योतिका
सूर्या हा तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार. तरुणांमध्येही त्याची क्रेझ आहे. २००६ मध्ये सूर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केले. या दोघांचे फॅनही चिक्कार आहेत. या लग्नाला कमल हसन, असीन, धनुष्य यांच्यासह अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली.
ऐश्वर्या आणि धनुष
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने अभिनेता धनुष याच्यासोबत लग्न केले. या लग्नाला केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्री नव्हे तर बॉलिवूडमधीलही मान्यवर उपस्थित होते. यात अमिताभ आणि जया बच्चन यांचा समावेश होता.
स्नेहा आणि प्रसन्न
स्नेहा आणि प्रसन्न या दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले. हे लग्न महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते.
राम चरण तेजा आणि उपासना कामीननी
अभिनेता राम चरण याने अपोलो रुग्णालयाच्या अध्यक्षांची नात उपासना कामीननी हिच्यासोबत विवाह केला. या लग्नाला देखील रजनीकांत, बोनी कपूर, अमिताभ बच्चन यांची उपस्थिती होती.