आकडेवारी माध्यमांच्या अहवालांवर आधारित आहे. देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पूर-संबंधित घटनांमध्ये ६०० हून अधिक लोक मरण पावले. आसाममध्ये १२९ , केरळमध्ये ७२ तेलंगणात ६१, बिहारमध्ये ५४, महाराष्ट्रात २३ उत्तर प्रदेशात ४८ आणि हिमाचल प्रदेशात ३८ जणांचा मृत्यू झाला. तसेच वादळ आणि वीज कोसळल्याने ८१५ लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर, सन १९०१ नंतर आठव्यांदा २०२० या वर्षी सर्वात अधिक उष्णता होती. परंतु २०१६ च्या उन्हाळ्यापेक्षा थोडे कमी तपमान होते. सन २०२० मध्ये देशातील वर्षाकाठी सरासरी वार्षिक तापमान सामान्यपेक्षा ०.२९ अंश सेल्सिअस होते.