नवी दिल्ली – रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा तुम्ही कोविड पॉझिटिव्ह होऊ शकता का? देशातील विविध शहरांमध्ये लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन केले जात आहे आणि त्यात फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत आहे.
विमा कंपन्या आणि थर्ड पार्टी एडमिनिस्ट्रेटर यांनी आरटीपीसीआरमध्ये निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड रुग्ण मानावे, असे आदेश वडोदरा नगरपालिकेने महामारी रोग अधिनियमांतर्गत दिले आहेत.
नव्या स्ट्रेनच्या रुग्णांना एचआरसीटी आणि प्रयोगशाळेच्या इतर तपासण्या केल्यास संसर्ग झाल्याचे सांगू शकतात. जोपर्यंत कोणत्याही आजाराचे निदान होत नाही, त्यांना कोविड झाल्याचे मानले जावे. देशात अनेक भागात अशा प्रकारची प्रकरणे आल्याचे डॉक्टर सांगत आहेत. रेडिओलॉजिकल तपासणीत निदान झाल्यानंतर कोविडचे उपाचर देत आहेत.
मानसिक आजारातून बरा झालेला प्रत्येक तिसरा व्यक्ती कोरोनातून बरा झालेल्या तिसर्या व्यक्तिला अनेक दिवस मेंदूशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अधिक लोक घबराटीने ग्रस्त होत आहेत. हा खुलासा एका संशोधनात झाला आहे, यामध्ये दोन लाखांहून अधिक लोकांवर लक्ष ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यात ३४ टक्के लोकांनी मनोविकारांबाबतच्या आजारांवर उपचार घेतल्याचे लँसेट साईकिएट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.
संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तिंमध्ये आठ महिन्यांनतर १० पैकी एका व्यक्तीमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे दिसत आहेत. हा खुलासा वैज्ञानिकांनी एका आरोग्याबाबत झालेल्या संशोधनात केला आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या सामाजिक आणि खासगी आयुष्यावर होत आहेत.
आरटीपीसीआरमध्ये ३० टक्के प्रकरणांमध्ये फॉल्स निगेटिव्ह म्हणजेच संसर्ग झाला तरी निगेटिव्ह अहवाल मिळू शकतो. त्यामुळे या चाचणीला ७० टक्केच यशस्वी मानले जात आहे.