नाशिक – शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून सोमवारचा दिवस नाशिकसाठी अत्यंत चिंताजनक ठरला. नाशिक शहरात तब्बल ८७६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरासह जिल्ह्यात १०१८ बाधित एकाच दिवसात झाल्याने चिंता आणखीनच वाढली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभरात २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात नाशिक शहरात ८७६, ग्रामीण भागात १२०, मालेगावमध्ये २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर, सोमवारी दिवसभरात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरात पाच, मालेगाव शहरात एक तर नाशिक ग्रामीण मधील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५३३ वर पोहचली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी
एकूण बरे झालेले – ११, ७८१
एकूण मृत्यू – ५३३
सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण – ४,३३५
नाशिक शहरात उपचार घेणारे रुग्ण – ३,१७५
नाशिक ग्रामीण भागात उपचार घेणारे रुग्ण – १०२७
मालेगाव शहरात उपचार घेणारे रुग्ण – १२८
नाशिक बाहेरील उपचार घेणारे रुग्ण – ५
आजपर्यंतचे एकूण बाधित – १६,६४९