नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गुरुवारी 72,330 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यावर्षी प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत देशभरात एकूण रूग्णांची संख्या 1,22,21,665 इतकी झाली आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर 2020 रोजी 24 तासांत कोरोना संक्रमणाची 74,383 प्रकरणे नोंदली गेली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या घटनेत आतापर्यंत 16,751 लोक मरण पावले आहेत, तसेच सलग 22 व्या दिवशी संक्रमणाचे प्रमाण वाढतच राहिले. यामुळे सक्रिय प्रकरणांची संख्या 5,84,055 वर वाढली आहे. एकूण संक्रमणाच 4.78 टक्के आहे. मात्र मृत्यू दर 93.89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी 1,35,926 सक्रिय रुग्ण प्रकरणे नोंदली गेली.
आतापर्यंत 1,14,74,683 लोक या आजाराने बरे झाले आहेत. यासह मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांपर्यंत गेले आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी देशात कोरोना संक्रमणाची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली. त्याचप्रमाणे 16 सप्टेंबरला 5O लाखांचा आकडा पार झाला. तर 1 डिसेंबरला एक कोटींचा आकडा पार झाला. 31 मार्चपर्यंत देशात 24,47,98,621 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. केवळ बुधवारी 11,25,681 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 459 लोकांपैकी 227 लोक एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू, , केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातील लोकांचा मृत्यू झाला.