मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरचे प्रचंड चाहते आहेत. ती सोशल मिडियावर सक्रीय राहते. इन्स्टाग्रामवर ती खास करुन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. लाखो चाहते असल्याने तिलाही नवनवीन पोस्ट शेअर करण्याची प्रेरणा मिळते. कधी कधी ती चाहत्यांच्या प्रश्नांनाही उत्तर देत असते. एका चाहत्याने मोठे धाडस करत जान्हवीला विचारले की, ‘मी तुला किस करु शकतो का?’. या प्रश्नामुळे जान्हवीला काहीसा राग आला. कारण, तिला अपेक्षितच नव्हते की कुणी चाहता असा प्रश्न विचारेल. अखेर जान्हवीने मास्क घातलेला फोटो शेअर करत चाहत्याला उत्तर दिले ‘नाही’.