नाशिक – केंद्र शासित प्रदेश निर्मीत मद्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून वाहनचालकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई पेठरोडवरील इनामबारी शिवारात करण्यात आली.
दिलीपभाई मोतीसिंग वसावा (३३ रा.टेकरा फलिया जि.भुरूच राज्य गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांचे नाव आहेत. दिंडोरीचे भरारी पथक क्र.३ चे दुय्यम निरीक्षक एस.एस.बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पेठरोड मार्गे मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे आणि उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी रात्री इनामबारी शिवारात सापळा लावण्यात आला होता. भरधाव येणा-या इको कार (जीजे ०६ एचएल ९६५५) अडवून पथकाने ही कारवाई केली. संशयीत चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता कारमध्ये ब्लेण्डर प्राईड,रॉयल चॅलेंज,मॅजिक मोमेट ओडका असा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत कारसह सुमारे ४ लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक बागुल करीत आहेत. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस.बी.शिंदे जवानव्ही.आर.सानप,एस.एस.पानसरे,