नवी दिल्ली – पाकिस्तानमधील एक गंभीर बातमी समोर आली आहे. शाहिन या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली असून हे क्षेपणास्त्र बलुचिस्तानातील रहिवासी भागात कोसळले आहे. त्यामुळे हजारो जण बेघर झाले असून शेकडो जखमी झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होत आहे.
चीनच्या पाठबळावर सुरू असलेल्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रमातील असुरक्षितता उघडकीस आली आहे. बलुचिस्तान प्रांतातील बलुचो कॉलनीत चाचणी सुरू असताना बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पडले, तेव्हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान जगाला माहित झाले. या अपघातात बरेच लोक जखमी झाले आणि डझनभर घरे उद्ध्वस्त झाली.
पाकिस्तानने अण्वस्त्रे बाळगण्यास सक्षम असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शाहीन-3 ची चाचणी केली. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनीही या यशाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. तथापि, अपुऱ्या सुरक्षा क्षमतेमुळे हे क्षेपणास्त्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. डेरा गाझी खानच्या राखी येथून टाकलेले हे क्षेपणास्त्र डेरा बुट्टीच्या निवासी भागात पडले. कारण पाकिस्तानच्या सैन्याने बलुचिस्तानला प्रयोगशाळा ठेवली आहे. लोकांच्या उपस्थितीत हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. यात बरेच लोक जखमी झाले आणि डझनभर घरे उद्ध्वस्त झाली.