चांदवड – चांदवडचे माजी आमदार स्वर्गीय जयचंदजी दिपचंदजी कासलीवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त चांदवड येथे दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन विठ्ठल मंदिराच्या बाजूला गुजराथ गल्ली चांदवड येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका महिला नागरी पतसंस्था,ब्लड बँक मालेगाव,ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन चांदवड, अर्थ फाउंडेशन नाशिक व सन्मती आय हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वर्गीय आमदार जयचंदजी कासलीवाल यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकणार लेख-
कार्यक्षम नेतृत्वाचा चिरंतन झरा .. स्व.जयचंदजी कासलीवाल
विष्णू थोरे, चांदवड
अथक परिश्रम, दृढ इच्छाशक्ती आणि प्रत्येक प्रसंगावर कौशल्याने मात करण्याची हातोटी असलेल्या स्व.जयचंदजी कासलीवाल यांच्या जीवन प्रवासाचा हा एक आढावा…
मितभाषी, संवेदनशील आणि सर्वसामान्यांच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे राजकीय क्षेत्रात असतानाही सर्वसामान्यांच्या वैयक्तिक सुख-दुःखाचीही त्यांना तेवढीच जाणीव होती. कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या चांदवडसाठी, चांदवडच्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे स्व.जयचंदजी कासलीवाल यांनी ओळखले होते. “पुणेगाव कालवा” योजना पूर्णत्वास जाण्यासाठी जलसंपदा विभागाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांनी पाठपुरावा केल्यावर कोणत्याही योजनेला तात्काळ मंजुरी मिळत असे, कारण त्यामागे त्यांचा मोठा अभ्यास आणि विकासाची तळमळ होती. पर्यटन विकास प्रकल्प, चंद्रेश्वर गड परिसर पर्यटन प्रकल्पाअंतर्गत रस्त्यांची कामे अशा अनेक कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते.
चांदवडच्या ऐतिहासिक आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेत चंद्रेश्वर महादेव मंदिर व चंद्रेश्वर बाबा यांचे स्थान अमूल्य आहे. द्वितीय चंद्रेश्वर बाबा महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी महाराज यांना शंकराचार्यांच्या व आखाडा परिषदेच्या धर्मसभेने “महामंडलेश्वर” ही पदवी देऊन गौरव केला. त्यानिमित्त चांदवड येथे महाराजांचा भव्य नागरी सत्कार जयचंदजी कासलीवाल यांनी घडवून आणला. या धर्म सोहळ्यामुळे अनेक साधू-संतांचे पदस्पर्श चांदवड नगरीला झाले.
चांदवड मधील पुरातन कार्तिकेश्वर महादेव मंदिर येथे ह.भ.प.संतश्रेष्ठ ढगे बाबा यांच्या मार्गदर्शनात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणच्या साधुसंतांच्या पवित्र कीर्तन आणि भजनाचा लाभ चांदवड मधील जनतेला या माध्यमातून घडून आला. असा अलौकिक अखंड हरिनाम सप्ताह तालुक्यातील जनतेने पहिल्यांदाच अनुभवला होता.
त्याकाळी चांदवड मधील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आरोग्याच्या उत्तम सुविधा नसल्यामुळे गर्भवती स्त्रियांचे बाळंतपण जुन्या पद्धतीने होत असे त्यामुळे अनेक बालक आणि मातांचे प्राण जात असत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते म्हणूनच चांदवड मध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव जयचंदजी कासलीवाल यांनी मंजूर करून घेतला. जनसेवेच्या सातत्यपूर्ण कार्यात त्यांना स्वतःची काळजी घेण्याचाही वेळ मिळत नसे. परंतु चांदवड वासियांच्या आरोग्यासाठी त्यांनी ही व्यवस्था केली.
पाण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या या आमदाराने दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास “प्राणांतिक उपोषण” करण्याचा धाडसी निर्णयही घेतला होता. आपल्या सहकाऱ्यांसमवेत हातीयागड धरण व पुणेगाव कालवा पूर्ण करण्यासाठी शासनाला त्यांनी गळ घातली. त्यामुळे काही प्रश्न सरकारने मान्य केले आणि पुढील प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिले. त्यांच्या प्राणांतिक उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव झाले व अनेकांना यातून एक नवी प्रेरणा मिळाली.
चांदवड मध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठीही त्यांनी मोठा प्रयत्न केला. त्याला देखील यश मिळाले. राहुड परिसरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. चांदवड मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अनेक विहिरी, वाडे आणि मंदिर बांधली. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे, या जाणिवेतून होळकर वाड्यात अहिल्यादेवी यांचा पुतळा बसवण्यासाठी त्यांनी आग्रह धरला व हे कार्य देखील त्यांनी पूर्णत्वास नेले.
आदिवासी मुलांसाठी काहीतरी करता यावे, त्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्था सुरू केली. या माध्यमातून आदिवासी मुलामुलींना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळू लागले.
आपले सर्वस्व वाहून घेऊन निस्वार्थ भावनेतून कार्य करणाऱ्या या अद्वितीय नेतृत्वातून अनेकांना आजही कार्याची मोठी प्रेरणा मिळते.