चांदवड – चांदवडच्या स्टेट बँकेचे कर्मचारी निळकंठ कुलथे यांचा सेवापूर्ती समारंभ स्टेट बँक चांदवड येथे नुकताच पार पडला. या सोहळ्या प्रसंगी चांदवड स्टेट बँकेचे शाखाधिकारी अजय वाले, निलेश पाटील, उज्ज्वल खैरणार, प्रवीण सोनवणे, के.म. पवार, दीपक तळपे, उमेश पगार, मयूर पाटील ,बाबासाहेब कोल्हे, रातनशेठ शहाणे, सचिन देवळलीकर, सचिन शहाणे, गजेंद्र कुलथे, जगदीश मोरे, अभिषेक गोस्वामी व सर्व स्टेट बँक कर्मचारी उपस्थित होते. कवी व गीतकार विष्णू थोरे यांच्या कवितांनी वातावरण मंत्र मुक्त झाले. निळकंठ कुलथे यांनी सर्वांचे आभार मानले.









