चांदवड- तालुक्यातील बापाने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरला विश्वनाथ हांडगे तर उपसरपंचपदी राहुल धोंडीराम हांडगे यांची अविरोध निवड करण्यात आली. यानिमित्ताने या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. साळी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच- उपसरपंचपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंचपदासाठी सरला हांडगे व उपसरपंचपदासाठी राहुल हांडगे यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठाकरे, सरला हांडगे, प्रमिला राजनोर, भाऊसाहेब गांगुर्डे, मनीषा पाटील उपस्थित होते. निवडणूककामी ग्रामसेवक नंदलाल माळवे, तलाठी एस. एम. तोडसम यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब हांडगे, दिलीप हांडगे, दत्तात्रय राजनोर, ज्ञानेश्वर पगार, गोकुळ हांडगे, सुनील हांडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अभिनंदन केले.