चांदवड- महंत स्वामी बंन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे सद्गुरू स्वामी दयानंदजी ( प्रथम चंद्रेश्वरबाबा ) व महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरीजी ( द्वितीय चंद्रेश्वरबाबा ) यांची संयुक्त पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने संपन्न झाला. भाविक-भक्तांनी गर्दी न करता कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले.
यावेळी हभप. वैराग्यमुर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांचे जाहीर किर्तन आयोजित करण्यात आले होते. भगवान श्री चंद्रेश्वर महादेव व श्री चंद्रेश्वरबाबांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली.