चांदवड – केंद्रीय भूजल प्राधिकरणच्या आदेशानंतर ज्या RO plants कडे भूजल सर्वे आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या NOC नाहीत ते मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडून सील करण्यात आले आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये थंड पिण्याचे पाण्याचे जार कॅन केंद्रीय भूजल प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासन यांची परवानगी न घेता चालू असतील अशा नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या थंड पिण्याचे पाण्याचे जार , कॅन प्रक्रिया केंद्र हे सीलबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपरिषद हद्दीतील पुढील थंड पिण्याचे पाण्याचे जार, कॅन विक्रेते रविंद्र सुरेश सोदे ,महावीर संकलेचा,संतु कारभारी कोतवाल,महादू भावराव कोतवाल ,सागर बाळासाहेब म्हस्के,कमरुनिसा मन्सूर शेख आदींचे Ro प्लॅन्ट सीलबंद केले.