चांदवड- चांदवड लासलगाव रोड वर असलेल्या कांदा चाळीतील सडलेला कांदा रस्त्यावर टाकल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना व पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे. आजूबाजूला राहणाऱ्या रहिवास्यांनी तक्रार करूनही सदर कांदा उचलण्यात आला नाही. कांद्याच्या दुर्गंधी मुळे त्यांनाही डास, मच्छर व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कांदा चाळी मालकांनी त्वरित हा कांदा उचलून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा या कांदा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावे असे मत येथील येथील स्थानिकांनी व्यक्त केले.