चांदवड – चांदवड येथील ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा रिंकू कासलीवाल यांना वारकरी, शेतकरी व कष्टकरी महामंडळाच्या वतीने महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून रिंकू कासलीवाल यांनी कोरोना काळात नागरिकांना कोविड-१९ या रोगापासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या रोगप्रतिबंधक आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे-आयुष काढ्याचे,गोरगरिबांना अन्न पदार्थांचे वाटप केले तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना कपडे,वह्या पुस्तकांचे वाटप,वृक्षारोपण, महिला सबलीकरण,रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमात त्या नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या कामाची दखल घेत खामखेडा ता.देवळा येथील वारकरी,शेतकरी व कष्टकरी महामंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.सुभाष काका बिरारी यांनी ह.भ.प.सरला बिरारी यांच्या हस्ते महिला भूषण पुरस्कार देऊन रिंकू कासलीवाल यांना सन्मानित करण्यात आले.