चांदवड – चांदवड येथे रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्थेचा उदघाटन सोहळा रविवारी संपन्न झाला. या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.सौ प्राजक्ता कुलकर्णी, चांदवड येथील नगराध्यक्षा सौ.रेखाताई गवळी, नगरसेविका सौ.मीनाताई कोतवाल याउपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ.सुनीता अग्रवाल यांनी केले. तसेच सौ.अभिलाषा दायमा यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
यावेळेस संस्थेचे अध्यक्ष सौ.जयशी कोकणे यांनी सांगितले की, ही संस्था चांदवड तालुक्यातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढेल. स्त्रियांशी संबंधित सर्व केसेस संस्थेमार्फत सोडवण्यात येतील. महिलांसाठी अशाप्रकारची संस्था चांदवड तालुक्यात प्रथमच सुरू होत असल्याने संस्थेला सर्वच स्थरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळेस चांदवड पोलीस स्टेशनने केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले. यानंतर डॉ.सौ.संगीत दोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सौ.सुनीता पवार यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळेस सौ.अर्चना पुरकर, सौ.सीमा काळे,सौ.वंदना काळे ,सौ.जयश्री कोकणे,सौ.संगीता दोशी, सौ.भारती शेवाळे, सौ.मोहिनी शिंदे, सौ.पूनम बांगरे, सौ.अभिलाषा दायमा, सौ.इंदूबाई वाघ, सौ.सुनीता पवार, सौ.सुनीता अग्रवाल, सौ.जयश्री ताई हांडगे, सौ.सिंधुताई लोखंडे, सौ.मीना कोकणे, श्री.विष्णू थोरे, श्री.दीपक शिरसाठ, श्री.रवि अहिरे, श्री पुंडलिक कोकणे आदी उपस्थित होते.