चांदवड : चांदवड येथे नव्यानेच सुरू होत असलेल्या खाजगी कोविड सेंटर बिल्डिंगला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी मालेगाव, पिंपळगाव, चांदवड अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाने केले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. या बिल्डिंगच्या खाली फर्निचरचे मोठे गोडावून असून हॉटेल रन वे ला देखील या आगीचा विळखा पडला आहे. या खाजगी कोविड सेंटरचे आजच उदघाटन होते. अशातच ही भीषण आग लागल्यामुळे मोठा वाईट प्रसंग उदभवला आहे.
दरम्यान ही आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाने स्पष्ट केले की, फर्निचरच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून कोविड सेंटर सुरक्षित आहे.