चांदवड – चांदवड येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात मॉंक इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. इन्फोसिस कंपनीने घेतलेल्या प्लेसमेंट ड्राईव्हच्या प्रथम फेरीमध्ये महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थी निवडून आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे मॉंक इंटरव्ह्यू महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. जिनल शाह, जी सध्या इन्फोसिसमध्येच कार्यरत आहे, हिने शनिवार २० मार्च २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने झूमवर घेतले.
या मॉंक इंटरव्ह्यूचा उद्देश विद्यार्थ्यांची मुख्य इंटरव्ह्यूसाठी तयारी करून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे असे होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पराग आचलिया यांनी प्रा. पंकज कापसे व प्रा. घनश्याम ढोमसे यांच्या सहकार्याने केले होते. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव कोकाटे, उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. महेश संघवी यांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक झुंबरलालजी भंडारी व सुनीलकुमारजी चोपडा आदीनी अभिनंदन केले.