चांदवड: येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्मार्ट मेझ प्लांटर व स्मार्ट शुगर केन प्लांट या दोन्ही प्रकल्पांची निवड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (MHRD) गव्हर्मेंट ऑफ इंडिया, दिल्ली यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन- २०२०-२१ या राष्ट्रीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेसाठी झालेली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे यांनी सांगितले की मोठ्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत एग्रीकल्चर व रुरल डेव्हलपमेंट या विषयासाठी संपूर्ण देशभरातून फक्त तीन प्रकल्पांची निवड करण्यात आलेली आहे आणि तीन पैकी दोन प्रकल्प हे चांदवड अभियांत्रिकीचे आहेत ही सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रकल्पांचे नाव पुढील प्रमाणे..
१. प्रकल्पाचे नाव :* स्मार्ट मेझ प्लांटर
टीमचे नाव: ऍग्रो यांत्रिकीज
*गाईड: प्रा. व्ही. सी. जाधव
*विद्यार्थी: सहाने निखिल, ठाकरे सागर, निखाडे प्रियंका, आहेर राहुल व खंगाळ कृष्णा.
२. प्रकल्पाचे नाव :* स्मार्ट शुगर केन प्लांटर
*टीमचे नाव: ऍग्रो अभियंताज
*गाईड: प्रा. व्ही. सी. जाधव
*विद्यार्थी: कोतवाल अंजली, लगड निलेश, भवर नंदकिशोर, गांगुर्डे सतीश, खापरे निखिल, नवले पायल.
प्रा. आर. एस. चौधरी हे महाविद्यालयाचे प्रकल्प समन्वयक आहेत.
या यशाबद्दल विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक झुंबरलालजी भंडारी, सुनीलकुमारजी चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. संचेती आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.