चांदवड – उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बातमीने चांदवडमध्ये सध्या चर्चेला उधाण आले आहे. अचानक आलेल्या या अविश्वास ठरावा्च्या वृत्तामुळे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी अनेक पोस्ट टाकल्या असून त्या सध्या चर्चेत आहे.
“भूषण भैया काळजी करू नको, अख्खं गाव तुमच्या पाठीशी आहे’ अशा आशयाचे एक व्यंगचित्रही आहे. काहींनी हे चित्र स्टेटस म्हणून सुध्दा ठेवले आहे. दरम्यान अविश्वास टाकणारे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे बोलले जात आहे.
अवघ्या काही महिन्यावर चांदवड नगर परिषदेची सार्वजनिक पंचवार्षिक निवडणूक आहे. त्यामुळे हा अविश्वास का आणला गेला या बाबत अजूनही तर्क वितर्क सुरू आहेत. त्यामुळे हा राजकीय विषय सध्या चांदवडमध्ये चर्चेचा ठरला आहे.