चांदवड- भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी राहुड येथील माजी सैनिक वाल्मिक गंगाधर पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मंगरूळ येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.भारतीताई पवार,माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ.डॉ.राहुल आहेर,भूषण कासलीवाल आदींच्या उपस्थतीतीत हे नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,विजय धकराव,डॉ.सुनील बच्छाव,वाल्मिक वानखेडे,बाजीराव वानखेडे, मिलिंद खरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.