चांदवड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाला बंदी घालण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. याच उद्देशाने आज (२० ऑगस्ट) चांदवड पोलिसांच्या वतीने राखीव पोलीस दलासोबत चांदवडच्या सोमवार पेठ, गाडगेबाबा चौक, वरचे गाव, राम मंदिर रोडवर पंथसंचालन करण्यात आले. यावेळी एपीआय स्वप्नील राजपूत, वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश गुरव, चांदवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल सनद, पोलिस निरीक्षक गजानन राठोड आदींसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.