चांदवड- चांदवड येथील मातोश्री जनरल स्टोअरचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार राजेंद्र संतू काळे वय ५० यांचे आज रविवार ३१ जानेवारी रोजी आकस्मित निधन झाले. दैनिक पुण्यनगरी,देशदूत तसेच सामना या दैनिकातून त्यांनी गेली २५ वर्षे पत्रकारिता करीत असतांना तालुक्यातील अनेक सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.त्याच्या पश्चात आई,पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना नंतर त्यांच्यावर चांदवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.चांदवड पोलिसात अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.