चांदवड- चांदवड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी सी . एस . देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून एकूण १७ प्रभागांच्या चिठ्या काढल्या गेल्या.
असे असेल आरक्षण
प्रभाग १ – महिला , प्रभाग २ – अनुसूचित जाती , प्रभाग ३ . नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , प्रभाग ४- सर्वसाधारण , प्रभाग ५- महिला , प्रभाग क्रमांक ६ अनुसूचित जमाती , प्रभाग ७ . नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , प्रभाग ८- महिला , प्रभाग ९- महिला , प्रभाग १० – अनुसूचित जाती , प्रभाग ११- नागरिकांचा मागास प्रवर्ग , प्रभाग १२. अनुसूचित जमाती महिला , प्रभाग १३. सर्वसाधारण , प्रभाग १४- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , प्रभाग १५- सर्वसाधारण , प्रभाग १६ . सर्वसाधारण , प्रभाग १७ – नागरिकांचा मागास प्रवर्ग .
आरक्षणामुळे बदलले गेले प्रभाग
आरक्षण सोडतीत शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, ज्येष्ठ नगरसेविका मिना कोतवाल, शिवसेना गटनेते जगन्नाथ राऊत, नगरसेवक अॅड . नवनाथ आहेर यांच्यासह मात्तबर नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण बदलले गेले. त्यामुळे येत्या निवडणुकीत हे मातब्बर नगरसेवक काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .