चांदवड – एकात्मीक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा परिषद निधीतून जिल्हा परिषद सदस्य डॅा . आत्माराम कुंभार्डे यांच्या विशेष प्रयत्नातून दिघवद येथे अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम पूर्ण झाल्याने इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम चांदवड पंचायत समिती सभापती पुप्षाताई धाकराव, उपसभापती नितीन आहेर, डॉ.नितीन गांगुर्डे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ.कुंभार्डे म्हणाले अंगणवाडी केंद्रासाठी इमारत प्रत्येक गावात झाली पाहिजे कारण लहान बालके उद्याच्या भारताचे भवितव्य आहेत. बालकांचा सर्वांगीन विकासासाठी इमारत चांगली असावी कोवीड परिस्थिती व शासनाची भूमिका यात ग्रामस्थांचे कर्तव्य या बाबत जनतेने दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उपसभापती नितीन दादा आहेर , माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, विजयजी धाकराव, गटविकास अधिकारी महेश पाटील, प्रशासक तथा विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, बालविकास अधिकारी अनिल चौधरी,सरपंच अमर मापारी , पोपटराव गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, शांताराम मापारी इ. मान्यवर ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम हांडगेसर यांनी केले व आभार ग्रामसेवक जाधव यांनी मानले.
विविध कार्यक्रमही संपन्न
मध्यम व तीव्र कुपोषीत बालकांना ग्रामपंचायत १० टक्के निधीतून एक मुठ पोषण आहार व महिला व बालकल्याण विभागामार्फत पहिल्या खेपेच्या मातेला देण्यात येणारे बेबी केअर किट देण्यात आले. त्याच प्रमाणे जि.प सेस मधून घेण्यात आलेले सॅनेटरी नॅपकीन किशोर वयीन मुलींना वाटप करण्यात आले, या प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री अनिल चौधरी व श्रीमती शिला बैरागी यांनी योजनेची माहिती दिली गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी एक मुठ पोषण , किशोरवयीन मुली यांना कुपोषण व स्वच्छता याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले . प्रशासक तथा विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे यांनी एक मुठ पोषण व आयुक्तालयातील विशेष पोषण आहार इडीएनएफ. वाटप केला.