चांदवड – चांदवड तालुक्यातील मंगरुळ येथील सोमा टोलवे प्लाझा येथे स्थानिक व तालूक्यातील वाहनांना टोल फ्री करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन नुकतेच सोमा टोलवे प्लाझा आय.एस.टी.पी.एल. मंगरुळ यांना देण्यात आले.
चांदवड शहर हे तालुक्याचे मुख्य बाजार पेठेचे ठिकाण असल्याने स्थानिक शेतकरी , व्यापारी , शैक्षणिक , व्यावसायिक व सामान्य नागरिकांना रोज – वारंवार येजा करावी लागते. या अनुषंगाने आपण एनएचएआय यांना कळवून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिनियम प्रमाणे जसे जिल्हयात इतर ठिकाणी तालुक्याती स्थानिकांना टोल फ्री केले आहे. त्याचप्रमाणे मंगरूळ टोलवे प्लाझा येथे टोल फ्री करण्यात यावे. तरी सदर स्थानिकांना टोल फ्री सुविधा तात्काळ देण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे,खासदार भारतीताई पवार, चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर,एन.एच.ए.आय , कार्यालय, पाथर्डी फाटा, नाशिक,आय.एस.टी.पी.एल., कार्यालय, धुळे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शांताराम भवर, मोहन शर्मा, शहर अध्यक्ष मनोज बांगरे,महेश खंदारे, योगेश ढोमसे, दीपक उशीर, विशाल ललवाणी, देवा पाटील,शिवाजीराव गवळी, गणेश पारवे,सुधाकर बेलदार, बाळासाहेब वाघ, हेमंत गुरव आदी उपस्थित होते.