चांदवड- नुकताच तालुक्यातील राहुड येथे कांद्याच्या रोपावर राउंड उप मारण्याचा प्रकार घडलेला असतांना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील प्रगतिशील शेतकरी दौलत महाराज ठोंबरे यांच्या शेतातील पाच वाफे कांदा रोप चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.
दौलत महाराज ठोंबरे यांनी चार पायली कांद्याचे रोप टाकलेले होते. दिवसभर कांदा लागण करून रात्री घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी या कांदा रोपावर डल्ला मारला आणि पाच वाफे कांदा रोप रात्रीतून लंपास केले. त्यामुळे दौलत महाराज ठोंबरे हवालदिल झाले असून या घटनेने परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावलेले आहे.
सद्या जिल्हयात कांदा रोपांचा प्रचंड तुटवडा असून सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाली आहेत.त्यामुळे कांदा रोपाला सोन्यासारखा भाव असूनही ते मिळणे कठीण झाले असताना असे प्रकार घडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दौलत महाराज ठोंबरे यांचे २० हजार रुपये किंमतीचे रोप चोरीला तर गेलेच परंतु भविष्यातील कांदा उत्पादन नफाही गेला आहे. आता कांदा लागवड करायची कशी ? ही नवीच समस्या त्यांच्या पुढे निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी आता असे प्रकार थांबण्यासाठी शेतात सीसीटीव्ही कॅमेरा व सौर लाईट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.