चांदवड – येथील मुंबई -आग्रा हायवेवरील पेट्रोल पंपावरील चौफुलीवर मनमाडकडून मालेगावकडे जात असलेल्या एच पी गॅस गाडी क्रमांक एम.एच.१२ सी.टी.३७८७ या वाहनाला मालेगाव कडून भरधाव येणाऱ्या लॅक्झरी गाडी क्रमांक जी.जे.१४.४१०१ या वाहनाने धडक दिली.या अपघातात कंटेनर व लक्झरी बाजूच्या डिव्हायडर वर पलटी झाली. त्यात सकाळी पायी फिरत असलेले वरचे गाव चांदवड येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी माधव व्यवहारे यांचे जेष्ठ चिरंजीव व जेष्ठ नागरिक अशोककाका व्यवहारे यांचे पुतणे सुनील माधवराव व्यवहारे (वय ६२) यांचा गाडीखाली जागीच मृत्य झाला. या अपघातात बाजूला उभ्या असलेल्या व्हॅन (ओमीनी) क्रमांक एम.एच.१५.इ.२१६० या गाडीचा चुराडा झाला आहे. इतर कुणालाही या अपघातात इजा झाली नसून अधिक तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हरिश्चंद्र पालवी, अमित सानप करीत आहे.