संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जोपूळ ग्रामपंचायतीवर भाजपच्या परिवर्तन पॅनलचे ९ पैकी ५ उमेदवार विजयी झाले असून कांग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव आणि दिगंबर वाघ व बाळासाहेब वाघ यांच्या लढतीत वाघ यांच्या पॅनलला विजय मिळाला आहे.वडनेरभैरव या तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर १७ जागांपैकी राष्ट्रवादी कांग्रेसला ८ ,भाजपला ५ तर कांग्रेसला ३ जागा मिळाल्या असून एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. राजदेरवाडी येथील भाजपचे तालुकाध्यक्ष व माजी सरपंच मनोज शिंदे यांच्याकडे एकहाती सत्ता आली असून राजदेरवाडीत तिसऱ्यांदा भाजपकडे सत्ता कायम राहिली आहे. उसवाड येथे कांग्रेसचे संजय पवार व राष्ट्रवादीचे अशोक अशोक गायकवाड यांच्यात लढत झाली असून पवार यांच्या गटाने ६ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. नांदुरटेक सत्ता परिवर्तन झाले असून ९ जागांपैकी भाजपला ४ तर कांग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. कारतवाडीत भाजपने ६ जागांवर विजयश्री मिळवली आहे तर विरोधकांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. रायपूरला भाजपच्या ११ जागांपैकी ११ तर भाडाणे येथे ९ पैकी ९ जागावांवर भाजपने विजय मिळविला आहे. वागदर्डी येथे सत्ता परिवर्तन झाले आहे.वाकी बुद्रुक येथे भाजपने ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविला आहे. कळमदरे भाजपच्या ५ जागा निवडून आल्या आहेत. एकूण बऱ्याच ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्याने भाजप हा तालुक्यातील मोठा पक्ष ठरला आहे.