चांदवड- चांदवड मध्ये तसेच तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून कोविड सेंटर मध्ये जागेचा तुटवडा निर्माण होत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकीत नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे.
येथील प्रशासकीय इमारतीत झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत चांदवड मध्ये ३ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येबाबत चांदवड तिस-या क्रमांकावर आहे. त्यामुळे जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे. यावेळी चांदवड मधील सर्व प्रतिष्टीत नागरिक,नगरसेवक,व्यापारी आणि पत्रकार उपस्थित होते.