चांदवड- चांदवड शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आज आमदार डॉ.राहुल आहेर यांनी सर्व अधिकारी वर्गाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचे रुग्ण संख्या लक्षात घेता बैठक झाली.यावेळी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले.
– कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांची अंबलबजावणी करणे आवश्यक आहेच त्याच बरोबर नागरिकांनी मास्क न लावणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
– शहरातील सर्व आस्थापनांनी सर्वांनी स्वतःची जबाबदारी म्हणून कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे व सोमवार पर्यंत नगरपरिषदने मुदत दिली होती. परंतु व्यापयऱ्यांची संख्या लक्षात घेता वेळ वाढवण्याचे व टेस्ट वाढवण्याचे सांगितले.
– शहरातील व ग्रामीण भागातील संशयित रुग्णांची तपासणी करावी व नमुना तपासण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. वाढती संख्या लक्षात घेता ट्रामा केअर सेंटर व्यतिरिक्त तात्काळ वाढीव कोविड सेंटर सुरू करावे.
– तसेच ज्या वार्डात रुग्ण संख्या वाढत आहे अश्या कंटमेंट झोन मध्ये मायक्रो झोन तयार करून संबंधित विभागाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात.
– शहरात अश्या होटस्पॉट भागावर वाढते रुग्ण आहे त्यामुळे तेथे जास्त लक्ष केंद्रित करावे व ठिकाणी कोविड फवारणी कराव्यात शहरात लॉकडाऊन नाही मात्र नियमांची कडक अंबलबजावणी करावी.
– शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ मध्ये शहरात कडकडीत बंद ठेवावे पाच पेक्षा जास्त गर्दी जमणार नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे पोलीस अधीक्षक समिरजी बारावकर यांना आमदार डॉ.आहेर यांनी निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार प्रदीपजी पाटील, वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.सुशील शिंदे, पोलीस अधीक्षक समीर बारावकर, गटविकास अधिकारी महेश पाटील, नगरपरिषद अभियंता चौधरी साहेब, भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, भाजपा संघटक गणेश महाले तसेच इतर अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.