चांदवड- कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस,युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले. आशिया खंडात सर्वात मोठा कांदा उत्पादन शेतकरी हा नाशिक जिल्ह्यात रहातो. संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थची नाळ ही कांद्याच्या पिकावर अवलंबून आहे. गेल्या मार्चपासून देशात कोरोना सारखे महासंकट असल्याने कांद्याला म्हणावा तसा भाव नाही मार्च पासून ते आँगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही. यावेळी कांदा हा कवडीमोल भावाने म्हणजे ३००ते ४०० रुपये प्रति क्विटंल विकला गेला. आता १० ते १२ दिवसापासून शेतकऱ्यांना थोडा बरा भाव मिळत होता कुठेतरी झालेले नुकसान काही लोकांचे भरुन निघत होते. अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडून गेला काहींचा थोड्याफार प्रमाणात वाचला. त्यात केद्रं सरकारने कुठल्याही विचार न करता निर्यात बंदी केली. त्यामुळे जे व्यापारी कांदे घेत होते व बाहेर पाठवत होते तेही आता शेतकऱ्यांचे कांदे घेणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदानात पुढे म्हटले आहे की, गहू खायला नसले तर लोक उपाशी मरतील, मात्र कांदा काही दिवस खाल्ला नाही तर कोणीही मरणार नाही. तर मग कांदा जिवनावश्यक कसा हा मोठा प्रश्न आहे. तरी सरकारने शेतकरी बाधंवाचा मागणीचा रास्त विचार करावा व निर्यात बंदी ताबडतोब उठवावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चादंवड तालुका तर्फ मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही देण्यात आला.
यावेळी दत्तात्रय वाघचौरे (रा.यु.काँ तालुकाध्यक्ष), रघुआण्णा आहेर ( जेष्ठ नेते ),अँड नवनाथ आहेर (नगरसेवक) प्रकाश शळके (शहरध्यक्ष), डॉ दिलीप शिंदे (डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष), रिझवान घासी (अल्पसंख्याक सेल प्रमुख),अल्ताफ तांबोळी(नगरसेवक), तुकाराम सोनवणे, समाधान जामदार (कार्यध्यक्ष), अनिल पाटील(जिल्हा सघंटक), शैलेश ठाकरे (जिल्हा उपाध्यक्ष), संदिप शिंदे (तालुकाउपाध्यक्ष) उत्तम झाल्टे, विनायक जाधव भाऊसाहेब शिरसाट, भूषण शळके सुरेश शिरसाट, सागर कोतवाल, विजू वाकचौरे उपस्थित होते.