चांदवड- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या नंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून सरकारविषयी नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरूनही याचा प्रचंड विरोध होतांना दिसत आहे. चांदवड येथे मार्केट कमिटीच्या आवारात प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अनेक शेतकऱ्यांसह आपण दिल्लीला धडकणार आणि आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला. या निषेधाच्या वेळी शेतक-यांनी ठिय्या सुध्दा मांडला.