चांदवड- ‘मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी’तर्फे १नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२०-२१. मध्ये नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड.जि.नाशिक. चे कलाशिक्षक देविदास शिवराम हिरे यांना चित्रकला,फलक रेखाटन,रांगोळी,इ.मार्फत कला क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मंगळवारी औरंगाबादकर सभागृह ,नाशिक येथे राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन सोहळा पार पडला. सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय,सांस्कृतीक, कला , इ. क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गुणिजनांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंदजी महाराज,अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड,ऍड.सुरेंद्र सोनवणे, पत्रकार विजयकुमार इंगळे, मानवधन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे ,समाजसेविका मिनाक्षी गवळी , सुत्रसंचालिका मनीषा कदम आदी मान्यवर व निमंत्रक यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या दक्षता नियमावलीनुसार हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात आला.