चांदवड- ऑनलाइन मका खरेदीसाठी परवानगी मिळणे बाबत चांदवड तालुका प्रहार संघटनेच्या वतीने खासदार डॉ.भारती पवार यांना निवेदन देण्यात आले.नाशिक ल्ह्यासह चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. असे असताना नोंदणी केलेल्यांपैकी ३० टक्के लोकांचीच खरेदी झालेली आहे तरी उर्वरित लोकांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष राम बोरसे, उपाध्यक्ष गणेश निंबाळकर,दीपक बोरसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.