चांदवड- चांदवड मधील १७५ वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करीत असलेली सर्वात जुनी शाळा असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदवड मुले (दगडी शाळा) या शाळेतील पाच वर्गखोल्या दुरुस्त करून मिळाव्यात यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना निवेदन देऊन साकडे घातले. या शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्त करण्याची मागणी या निवेदनात केलेली आहे. शाळा पूर्व वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या खोल्या दुरुस्त केल्यानंतर शाळेच्या विकासास अधिक मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे आहे. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी सुभाष शेठ कोल्हार,महेश खंदारे ,दिनेश पुरकर ,विजय क्षत्रिय,अशोक काका व्यवहारे,विष्णू थोरे आदी मान्यवर उपस्थित होते.