नाशिक- गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना चांदवड येथे पोलीस हवालदाराला रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. अशोक सुखदेव फुलमाळी असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदारावर चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार फुलमाळी यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने पडताळणी करून गुरुवारी सापळा रचुन पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.