चांदवड – चांदवड येथे माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्रदान शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे पुत्र, चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर एकंदरीत रक्तदानाची कमी झालेली संख्या आणि रुग्णांची वाढलेली संख्या याचे व्यस्त प्रमाण पाहता, नजीकच्या भविष्यात रक्ताची गरज भरून काढण्यासाठी रक्तदानाची आवश्यकता होती. त्यासाठी सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक होते. स्व. जयचंद कासलीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पवित्र सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे ७५ जणांनी सहभाग नोंदविला. मालेगाव ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
तसेच नेत्र तपासणी आणि चिकित्सा याबाबत गरजूंना लाभ घेता यावा यासाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला. सन्मती आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
जनसेवेसाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते, त्यांचा स्मृतिदिन हा जनसेवेच्या कार्याने साजरा करणे सर्वाधिक सयुक्तिक वाटते असे मत चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष युवा नेते भूषण कासलीवाल यांनी व्यक्त केले. या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात आदरांजली वाहण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. अनेकांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमास सुरेश जाधव, कदम माऊली, गोविंदराव कर्डिले, बाळासाहेब शेळके, शेळके सर, कौसर घाशी, डॉ.मनोज दगडे, सोनल दगडे, सुनील डुंगरवाल, कासलीवाल, रिंकू कासलीवाल, चौबे सोनवणे, बोराडे, राजाभाऊ अहिरे, प्रशांत ठाकरे, मनोज बांगरे, नितीन फंगाळ निफाडे तसेच पत्रकार बंधु, संमती आय हॉस्पिटल येथील स्टाफ, मालेगाव ब्लड बँक स्टाफ, चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्था, ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. समस्त कासलीवाल परिवारातर्फे उपस्थितांचे आभार मानण्यात आले.