चांदवड- मनमाड-चांदवड रोडवरील माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या शेतात मंगळवार दिनांक ९ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता बिबट्या आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वप्नील जाधव यांना या बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी तत्काळ वनरक्षक गोपाल राठोड यांनी फोनवर ही माहिती दिली. राठोड यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिली. ती बिबट्याची मादी असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. सध्या तरी या मादीचा कुठलाच उपद्रव नसून वनाधिकार गोपाल राठोड यांनी त्वरित परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. आपली गाय,वासरे,शेळ्या सुरक्षित ठिकाणी बांधण्यास सांगितले आहे. याप्रसंगी रामचंद्र जाधव, सुभाष कोल्हार, संतोष सुतारे, स्वप्नील जाधव, संसारे आदी उपस्थित होते.